गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधून मार्च / एप्रिल २०२४ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थगित करण्यात आलेला पदवीदान समारंभ गुरुवार दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला संस्थेच्यावतीने सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी संबंधित विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.