मुंबई विद्यापीठ आणि के. सी. जैन महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२० संपन्न झाल्या. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रतीक्षा साळवी (+८४ वजनी गट) हिने स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.
कु. प्रतीक्षा हिच्या चमकदार कामगिरीबद्दल तिचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सातीशजी शेवडे, जिमखाना समिती सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी अभिनंद केले आहे.