gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘नवमतदार नोंदणी अभियान’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘नवमतदार नोंदणी अभियान’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातीलतरुण आणि पात्र नवमतदारांसाठी नुकतेच नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

भारताने लोकशाही शासन पध्दतीचा स्वीकार केला असून; १८ वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुक्त, खुल्या आणि नि:ष्पक्ष निवडणुका या लोकशाहीचा आधार असतात. निवडणुकांच्या संचलनाची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दरवर्षी आयोगामार्फत अद्ययावत मतदार यादी तयार केली जाते. या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील तरुण व पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मतदारनोंदणी करता यावी या हेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पूर्वीपासून नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, रत्नागिरी, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदारांसाठी नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत नवमतदार विद्यार्थांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात मतदार नोंदणी केली.

या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी उपस्थित होत्या. नवमतदार विद्यार्थांनी स्वतः नोंदणी करून, नागरिकांमध्ये देखील मतदार नोंदणीप्रक्रियेविषयी जनजागृतीचे कार्य राष्ट्रीय कार्य म्हणून करावे आणि लोकशाही सक्षमीकरणासाठी हातभार लावावा आणिया अभियानात विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नवमतदार नोंदणी करावी,असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांचे बहुमोल मागर्दर्शन तर कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखा उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. यास्मिन आवटे, तहसील कार्यालयातील कर्मचारी आदीसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाचे समन्वयक म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी काम पाहिले. नवमतदार नोंदणी अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Comments are closed.