gogate-college-autonomous-updated-logo

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघास 1 रौप्य व 2 कांस्य पदक प्राप्त

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघास 1 रौप्य व 2 कांस्य पदक प्राप्त

दि. 3 ते 5 जानेवारी 2024 रोजी मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला पॉवरलीफ्टींग- 2024 स्पर्धेचे आयोजन प्राचार्य एम. एम. के. महाविद्यालय, बांद्रा येथे  करण्यात आले होते.  मुंबई विद्यापीठ पुरुष   पॉवरलिफ्टिंग  स्पर्धेत कु.सिद्धेश सुकम या विद्यार्थ्यांने  83 Kg  वजनी  गटात 555 Kg. वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले.

महिलांच्या पॉवरलिफ्टीग स्पर्धेत  कु. दिशा गुरव हिने 52 Kg. वजनी गटात 250 Kg. वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले, व  कु. ऋतुजा गुरव हिने 63 Kg. वजनी गटात 252 Kg. वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले. तर कु. गौरी जाधव हिने 57 Kg. वजनी गटात  पाचवा क्रमांक प्राप्त केला.

स्पर्धेतील पदक विजेत्या संघातील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समिती अध्यक्ष. डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी, तीनही विभागांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, सेवक वर्गाने शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.