gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) उद्योजकतेवरील परिसंवादाचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) उद्योजकतेवरील परिसंवादाचे आयोजन

दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उद्योजकतेवर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे होता.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एस.एम.जे. कन्सलिन्सचे संस्थापक श्री. राहुल जोशी आणि ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत आंत्रप्रेन्युअर्सचे संस्थापक सीए श्री. सिद्धार्थ सिनकर होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्केटिंग, नेतृत्व कौशल्ये, व्यवसाय नियोजन, आणि सुरुवातीच्या काळातील अडचणींवर मात कशी करावी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तरे सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि बाजारातील बदल, भांडवल उभारणी, जोखीम व्यवस्थापन यांसारख्या अनेक विषयांवर प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी त्यांची उत्तरे अत्यंत सोप्या आणि प्रात्यक्षिक उदाहरणांसह दिली.

श्री. राहूल जोशी यांनी “नवीन विचार करण्याची हिंमत आणि प्रत्येक अपयशातून शिकण्याची तयारी ठेवल्यास यश हमखास मिळते,” असे प्रतिपादन केले. तर श्री. सिद्धार्थ सिनकर यांनी जागतिक स्तरावर नेटवर्किंगचे महत्त्व आणि संधींचा योग्य उपयोग करण्यावर भर दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन केले, तर डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत अशा कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले. या परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेची दृष्टी मिळाली आणि त्यांचे आत्मविश्वासही वाढले.

सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, सारस्वत आंत्रप्रेन्युअर्सचे श्री. मनोज तेंडुलकर, श्री. सुर्यकांत कुलकर्णी, विद्यार्थी सचिव कु. मीहिका केनवडेकर, स्वराज साळुंखे, कु. पुर्वा कदम, अथर्व चव्हाण उपस्थित होते. या परिसंवादाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

उद्योजकतेवरील परिसंवाद उद्योजकतेवरील परिसंवाद

 

Comments are closed.