गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी ‘सामुहिक वाचन उपक्रमात’ सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन तरुणांना वाचनाकडे वळविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. दि. १ ते १५ जानेवारी २०२५ हा वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन करून वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मुंबई विद्यापीठाच्या सुचनेनुसार आज दि. १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभागातील सर्व विद्यार्थी एक तास सामुहिक वाचन उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी आपल्या आवडीची विविध विषयांना वाहिलेली पुस्तके वाचली तसेच उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र, ठाकूरदेसाई, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, ग्रंथालय लिपिक श्री. सचिन पेडणेकर, कर्मचारी श्री. गोविंद वासावे आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.