gogate-college-autonomous-updated-logo

‘राष्ट्रीय सेवा योजना सकारात्मक उर्जास्त्रोत’ – प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर ; निवासी शिबिराचा यशस्वी सांगता समारंभ संपन्न

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबीर केळ्ये येथे २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत पार पडले. या शिबाराचा सांगता समारंभ गोडबोले हायस्कूल येथे संपन्न झाला. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संपूर्ण उपक्रमाची पाहणी करून व श्रमदानातून निर्मित बंधारे व रस्ते, ग्राम स्वच्छता यांची पाहणी केली.

आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य साखळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग एक उर्जा स्त्रोत असून शिबिरात सहभागी स्वयंसेवकांनी ही उर्जा अधिकाधिक ग्रहण केली पाहिजे असे सांगितले. स्वयंसेवकांनी केलेल्या सर्व स्वच्छता उपक्रम, पथनाट्य, बंधारे, शालेयआवर दुरुस्ती, परसबाग निर्मिती, रस्ता निर्मिती, सर्वेक्षण, जनजागृती उपक्रम, संसाधन मापन या बाबींचे विशेष कौतुक केले. आपल्या कामाचा तसेच ज्ञानाचा फायदा ग्रामीण समुदायास करून देताना स्वयंसेवक स्वताला देखील घडवीत असतो. भावी जीवनात शिबिरातील प्रेरणा आणि अनुभवच कामास येतात असे त्यांनी सांगितले.

गोडबोले हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तीचे व कामाचे कौतुक केले. सरपंच सौ. सौरवी पाचकुडवे यांनी बंधाऱ्यांच्या उपयोग ग्रामस्थांना होईल तसेच अन्य कामाचे विशेष उल्लेख केले. उपसरपंच श्री. काशिनाथ बापट यांनी स्वच्छता आणि स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव केला. गोडबोले शाळेचे शिक्षक श्री. गजानन केळकर यांनी स्वयंसेवकांनी सक्षम नेतृव व कार्याचा वारसा आदर्शपणे पुढे नेल्याचे सांगून सर्व कार्यक्रमाधिकारी यांचेही कौतुक केले.

सात दिवशीय शिबिरात श्री. स्वरूप जिरोळे, श्री. पार्थ बापट, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई , श्री. सुहास सहस्त्रबुद्धे, श्री. सुरेंद्र केळकर, कौशिक मुसळे , प्रा. उमा जोशी,श्री. हृषीराज नागवेकर, डॉ. सोनाली कदम , श्री. काशिनाथ बापट, प्रा. विनायक गावडे, प्रा. नीता खामकर, प्रा. सुर्यकांत माने, डॉ. राजेश कांबळे, डॉ. आनंद आंबेकर, प्रा. प्रभात कोकजे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. सर्वेक्षण आणि संसाधन मापन या विशेष उपक्रमाचे आयोजन या शिबिरात करण्यात आले होते.

पायवाट दुरुस्ती, २२ व २६ फुटाचे बंधाऱ्यातून ४६१०० व १३२१६ लिटर पेक्षा अधिक पाण्याचा साठा केला गेला, पाच सार्वजनिक विहिरींच्या अभ्यासासोबत, प्रश्नावली व मुलाखतीद्वारे पाणी वापर अभ्यास, तसेच महिला आरोग्य, ग्रामीण उत्पादक आणि शेतकरी यांचाही १०० घरांचा सर्व्हे या शिबिरातील स्वयंसेवकांनी केला. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, रस्ते, मोहल्ला व मस्जिद परिसर स्वच्छते सोबत, नदीकिनारा स्वच्छता व प्लास्टिक संकलन सुमारे ८२ किलो इतके करण्यात आले. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी तसेच रेड रिबन क्लब माध्यमातून जनजागृती व पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. माहिती पत्रकांचे वाटप केले गेले. नशामुक्ती, गुप्तरोग, कौटुंबिक हिंसाचार, पर्यावरण अशा विषयावर पथनाट्य सादर केली गेली. प्रा. उमा जोशी यांनी सर्व स्पर्धांचे नियोजन व परिक्षण यशस्वीपणे केले.

आपल्या मनोगतात कु. सना चौघुले हिने शिबिरात मिळालेल्या आत्मविश्वासाचे आभार मानले तर कु. श्रेयस रसाळ याने विविध उपक्रम व मार्गदर्शन भावी आयुष्यात खूप फायदा होणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी सरपंच सौरवी पाचकुडवे, प्रा. अरुण यादव, कार्यक्रमाधिकारी श्री. सचिन सनगरे. प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. उमा जोशी, श्री. गजानन नाखरेकर, श्री. रामचंद्र केळकर व स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा. उमा जोशी यांनी मुंबई विद्यापीठ मुंबई, जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोडबोले हायस्कूल, केळ्ये ग्रामपंचायत सरपंच,पोलिस पाटील श्री. अशोक केळकर, ग्राम सचिव सौ.शिल्पा गोंडाळ, डॉ. पूजा माने, ग्रामस्थ, सौ. भाग्यश्री काळे -घरत, सौ. वीणा लिंगायत, श्री. जहूर धर्मे, श्री. लियाकत पावसकर, श्री. अबू हसन कोंडकरी, श्री. अंकुश माचीवले, श्री. सुरेंद्र केळकर व शिबीर यशस्वी करण्यासाठी मदत व सहकार्य करणारे सर्व आजी माजी स्वयंसेवक यांचे आभार व्यक्त केले. वंदेमातरम गीताने शिबिराची सांगता झाली.

विविध स्पर्धांतील विजेते
सर्वोत्तम स्वयंसेवक – ऋषिकेश वाडेकर, रिया कुळ्ये,
सर्वोत्तम श्रमदान – गुरुराज घाटकर,मालवी होरंबे,
उत्तम नेतृत्त्व- पूर्वा चव्हाण,
सर्वोत्तम गट -परंपरा,
सर्वोत्तम शिबिरार्थी पुरस्कार- दीपराज ढवळे
यास प्राप्त झाला. याशिवाय अन्य स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

निवासी शिबिराचा यशस्वी सांगता समारंभ संपन्न निवासी शिबिराचा यशस्वी सांगता समारंभ संपन्न
निवासी शिबिराचा यशस्वी सांगता समारंभ संपन्न निवासी शिबिराचा यशस्वी सांगता समारंभ संपन्न
Comments are closed.