gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. अथर्व फडणीस कु. चेतन जाधव आणि कु. सौरभ झगडे या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कु. अथर्व फडणीस (प्रथाम वर्ष कला), कु. चेतन जाधव (प्रथम वर्ष कला) आणि कु. सौरभ झगडे (एम.कॉम.; भाग-२) या तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची दि. १० ते १८ जानेवारी २०२५ रोजी सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट, गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभाग राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धे करिता मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल संघात निवड झाली आहे.

पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठ पुरूष हँडबॉल संघात निवड झालेल्या कु. अथर्व फडणीस, कु. चेतन जाधव आणि कु. सौरभ झगडे या विद्यार्थ्याना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना समितीचे उपाध्यक्ष क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, डॉ. विवेक भिडे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी तसेच सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.