रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी मार्गदर्शन करताना नवीन कायद्याची ओळख व अंमलबजावणी कशी होते याची थोडक्यात माहिती दिली. रत्नागिरीचे डी.वाय.एस.पी. श्री. निलेश माईणकर यांनी जुना कायदा आयपीसी ते बी.एन.एस. बदलाची माहिती दिली. कै.अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या समन्वयक अॅड. सोनाली खेडेकर यांनी ‘पॉश’ कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी श्री निखिल पाटील व सीनियर पी आय श्री शिवलकर रत्नागिरी सिटी पोलीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच अध्यक्षीय मनोगत करताना महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण समिती कशी काम करते हे सांगितले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
![]() |
![]() |









Visitors Online : 2