गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वुमन डेव्हलपमेंट सेल विभागागातर्फे रोटरी क्लब मिडटाउन आणि इनर व्हील मिडटाउन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक वुमन डेव्हलपमेंट सेलच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी रोटरी क्लबचे श्री. हिराकांत साळवी, श्री. राजेंद्र कदम तसेच दंतचिकित्सक डॉ. वैभव कानडे डॉ. प्रियांका कांबळे, डॉ. स्वप्ना करे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.
शिबिरा दरम्यान रक्तगट, हिमोग्लोबिनचे प्रमाण, दातांचे आरोग्य, स्त्रीरोग याबाबत विद्यार्थ्यानींची तपासणी करून आवश्यक औषधोपचार सुचविण्यात आले. शिबिरात महाविद्यालयातील १४० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. गौरी पटवर्धन यांनी केले. या शिबिरासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्वांना सदिच्छा दिल्या.







Visitors Online : 1