गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ‘Advanced JavaScript Framework’ या व्यावसायिक कौशल्य सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ नोव्हेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत छत्तीस तासांचा ‘Advanced JavaScript Framework’ ’हा व्यावसायिक कौशल्य सर्टिफिकेट कोर्स संपन्न झाला. या वर्गात टी.वाय.आटी या वर्गातील तीस विद्यार्थी सहभागी झाले होते.
या Advanced JavaScript Framework कोर्स अंतर्गत श्री.रिदान पावसकर,श्री.श्रीनिवास जोशी,श्री.अथर्व देवस्थळी,श्री.यश वाघधरे,मृणाल कीर,हिबा मुजावर यांनी Advanced JavaScript Framework या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अवगत कौशल्यांवर आधारित परीक्षा घेण्यात आली. अभ्यास वर्गाचा समारोप समारंभ दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी माहितीतंत्रज्ञान विभागात पार पडला . या कार्यक्रमास पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, पीएमउषा कौशल्य विकास सर्टिफिकेट कोर्स समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी उपस्थित होत्या.
सदर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेधा सहस्त्रबुद्धे यांनी केले.







Visitors Online : 1