gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा अभूतपूर्व विजय सलग 3 जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा गौरव

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा अभूतपूर्व विजय सलग 3 जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा गौरव

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान मिळवला आहे. विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत त्यांनी महाविद्यालयाच्या यशात नवा अध्याय जोडला आहे.

पहिली ट्रॉफी: दि: ११/जानेवारी/२०२५ रोजी A.S.P. College, देवरुख आयोजित “National Level Tech Carnival” मध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत 4 कोडींग स्पर्धा, 1 वेब डेव्हलपमेंट आणि 1 क्विझ अशा एकूण 6 पुरस्कार मिळवले.

दुसरी ट्रॉफी: दि: २९/जानेवारी/२०२५ रोजी S.P. हेगशेट्ये कॉलेज, रत्नागिरी यांनी आयोजित “Quize-IT” राज्यस्तरीय स्पर्धेत देखील महाविद्यालयाने आपले वर्चस्व राखले. यामध्ये 2 वेब डेव्हलपमेंट, 1 कोडींग आणि 1 गेमिंग अशा एकूण 4 पुरस्कार जिंकण्यात आले.

तिसरी ट्रॉफी: दि: दि:-०६/फेब्रुवारी/२०२५ रोजी Finolex Academy of Management and Technology आयोजित “Excellentia” या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 2 कोडींग, 2 क्विझ आणि 1 वेब डेव्हलपमेंट अशा 5 पुरस्कारांसह विजय मिळवला.

या ऐतिहासिक यशासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख सौ. मेधा सहस्रबुद्धे, IT आणि CS विभागाच्या समन्वयक सौ. अनुजा घारपुरे, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विजेत्यांचे भरभरून कौतुक केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तंत्रज्ञ विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा अभूतपूर्व विजय सलग 3 जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा गौरव गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा अभूतपूर्व विजय सलग 3 जनरल चॅम्पियनशिप जिंकण्याचा गौरव
Comments are closed.