गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), संगणकशास्त्र विभागातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील हर्षद कोरगावकर याने आपल्या महाविद्यालयाचा गौरव वाढवत प्रतिष्ठित अशा ‘प्रोजेक्ट एक्सपो’ ही राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शनी मध्ये द्वितीय पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती.
हर्षद याच्या ‘स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टम’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने परीक्षकांना विशेष प्रभावित केले. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरगुती स्वयंचलन अधिक प्रभावी करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक करण्यात आले. या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना रौप्यपदक तसेच ₹५,००० रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तसेच संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, प्राध्यापक प्रा. सनिल सावले आणि प्रा. प्रशांत लोंढे यांनी हर्षदच्या मार्गदर्शनासाठी विशेष मेहनत घेतली. हे उल्लेखनीय यश गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, मेहनत आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यांचे प्रतिक आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी हर्षदचे अभिनंदन केले व त्याच्या मेहनतीचे कौतुक केले.
![]() |
![]() |







Visitors Online : 3