पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग दि. २० जानेवारी ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात आला. या प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून परीक्षेत एकूण ८२ प्रशिक्षणार्थींपैकी ६२ उत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल ७५.६०% लागला आहे.
या परीक्षेत श्रीम. स्मिता अशोक कांबळे यांनी प्रथम क्रमांक, श्रीम. गौरी सतीश भटसाळसकर यांनी द्वितीय क्रमांक तर श्रीम. अंजली अमित नागविसकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मोडीलिपी प्रशिक्षण वर्गासाठी श्री. महेश पाटील, सहायक संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, श्री. सर्जेराव वाडकर, कोल्हापूर पुरालेखागार, श्री. लक्ष्मण भिसे, पुणे पुरालेखागार आणि संचालनालयाच्या अन्य कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय वतांत्रिक सहकार्य लाभले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करताना सांगितले की, मोडीलिपी हा आपला वारसा आहे. या प्रशिक्षणामुळे केवळ लिपी वाचनाचे कौशल्य विकसित होणार नाही, तर याचा उपयोग करून रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. इतिहास विभागाच्या पुढाकाराने राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याबद्दल समाधान व्यक्त करत असे प्रशिक्षण वर्ग पुढेही आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.






Visitors Online : 2