gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. याप्रसंगी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, डॉ. शाहू मधाळे, डॉ. शिवाजी उकरंडे, डॉ. दिवाकर करवंजे इ. मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केली. अनेक विषयांमध्ये त्यांनी सखोल अभ्यास करून त्या विषयांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांना घटनेचे शिल्पकार मानले जाते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचा विकास पोहोचला पाहिजे असे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यांचे विविध ग्रंथ आपल्याला कायम मार्गदर्शक ठरतील. आजचे ग्रंथ प्रदर्शन त्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे; आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा’ असे आवाहन केले. त्यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्या दिल्या.

या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्रध्यापक, अध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. आभारप्रदर्शन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.

Comments are closed.