रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ जून रोजी ‘जागतिक योग दिवस’ साजरा करण्यात आला. दि. २७ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा करावा असे जगातील सर्व देशांना आवाहन केले. त्यामुळे दि. २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा साजरा केला जातो. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुहिक योगासने केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ. निधी पटवर्धन यांनी योगा प्रोटोकॉल प्रमाणे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक यात सहभागी झाले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृती, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे स्थान, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात झालेले बदल , महाविद्यालयाने शिक्षक व विद्यार्थांसाठी राबविलेले प्रमाणपत्र कोर्स यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमित योगासने केल्यास त्यांना दीर्घ आरोग्याबरोबरच उत्तम मानसिक स्वास्थ प्राप्त होईल. त्यामुळे आजच्या दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी संकल्प करून नियमित योगासने करावीत आणि आपले शेजारी आणि समाजातील इतर घटक यांनाही याचे महत्व सांगून त्यांनाही प्रवृत्त करावे’ असे आवाहन केले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. हा योग दिन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सर्व शाखांचे उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. योग उपक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता प्रा. लीना घाडीगावकर, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा.राकेश मालप, जिमखाना कर्मचारी श्री. महेश खैरे, श्री. भुवड यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८२ स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. याच सोबत महाविद्यालयातील विविध शाखांतील वर्गात विद्यार्थ्यांना यागाचे महत्व व प्राणायाम प्रत्येशिक घेण्यात आली. ४५० विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ घेता आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन सनगरे यांनी केले. प्रा. अभिजित भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना सात्विक अल्पोपहार देऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली.
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 2