येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने गुरुपौर्णिमा निमित्त ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमाअंतर्गत बीज वाटप करून गुरुपौर्णिमा साजरी केली. सोबत प्रत्येकाने एक रोपटे लावण्याची शपथ घेण्यात आली.
गौरांग नामजोशी या स्वयंसेवकाने गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते हे सांगून उपस्थित स्वयंसेवकांना प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे यांचे हस्ते बीज वाटप केले. प्रत्येकाने आपल्या परिसरात पर्यावरण स्नेही असले पाहिजे असे सांगितले. निसर्गामध्ये जैवविविधता असली पाहिजे केवळ एकाच प्रकारची झाडे न लावता वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लाऊन जागवली गेली पाहिजेत. या हेतूने पशु, पक्षी व मानव यांना उपयुक्त शेवगा झाडाच्या १०० बियांचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमास शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांना प्रेरित केले. या उपक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक गुरुराज घाटकर, रिया कुळ्ये, अदिती कुळ्ये, पूर्वा चव्हाण यांनी नियोजन केले.






Visitors Online : 0