कोकणातील प्रतिथ यश संपन्न अशा गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे उर्दू विभागाच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० व्या शतकातील उर्दू साहित्यातील प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका इस्मत चुगताई यांच्या साहित्यावर आधारित हे चर्चासत्र असणार आहे.
बर्नाड शॉ यांच्या लेखनाने प्रभावित होऊन स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात इस्मत चुगताई यांनी नाटक,कथा,लिहिल्या.मध्यमवर्गीय मुस्लीम युवतींच्या मानसिक अवस्थेचे त्यांनी सूक्ष्म आणि सखोल निरीक्षण केले.प्रेम आणि वासना याबद्दलच्या रूढ कल्पनांचा त्यांनी उपहास केला.सौंदर्य,स्त्री-पुरुष संबंध,सामाजिक रूढी आणि संकेत याविषयी परिवर्तनवादी भूमिका त्यांनी घेतली.पुरुषसत्ताक समाजातील स्त्री जीवनाची शोकात्म बाजू त्यांनी आपल्या लेखनामधून मांडली.साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले.त्यांच्या लेखनाच्या विविध पैलूंची चर्चा या आयोजित चर्चासत्रात केली जाणार आहे.
भारतभरातून अनेक नामवंत उर्दू साहित्यिक,संशोधक,अभ्यासक या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथील उर्दू विभागाचे प्रमुख प्रा.मसरत फिरदोस यांचे बीजभाषण होणार आहे तर कॅप्तन जावेद पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.खेड येथील बज्म इमदादिया शिक्षण संस्थेचे प्रमुख मा.ए.आर.डी.खतीब हे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तरी सर्व उर्दू अभ्यासक,संशोधकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी केले आहे.






Visitors Online : 1