महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय(स्वायत्त),रत्नागिरी येथे करिअर संसदेची स्थापना करण्यात आली.या करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री,नियोजन मंत्री,कायदे व शिस्तपालन मंत्री,सामान्य प्रशासन मंत्री,माहिती व प्रसारण मंत्री,उद्योजकता विकास मंत्री,कौशल्य विकास मंत्री, रोजगार-स्वयंरोजगार मंत्री,संसदीय कामकाज मंत्री,महिला व बालकल्याण मंत्री आणि सदस्य या पदांवर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
या करिअर संसदेचा शपथविधी कार्यक्रम दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या केळकर सभागृहात थाटात संपन्न झाला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी करिअर संसदेतील सर्व पदाधिकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
महाविद्यालयातील करिअर संसदेतील विद्यार्थीनी कु.श्रुती सुहास गोगटे (मुख्यमंत्री),कु.करिष्मा सुधाकर हसये(नियोजन मंत्री),कु.रिद्धी प्रेमनाथ नागवेकर(कायदे व शिस्तपालन मंत्री),कु.सिद्धी सुधाकर साखळकर(सामान्य प्रशासनमंत्री),कु.तन्वी दिलीप जाधव(माहिती व प्रसारण मंत्री),कु.आर्या रशिकांत पिलणकर(उद्योजकता विकास मंत्री),कु.मधुरा संजय मुळ्ये(रोजगार-स्वयंरोजगार मंत्री),कु.श्रावणी श्रीकांत मुळ्ये(कौशल्य विकास मंत्री),कु.भूमिका सुरेंद्र चंदरकर(संसदीय कामकाज मंत्री),कु.लावण्या विनायक पाटील(महिला व बालकल्याण मंत्री) आणि कु.वेदिका कोळी(सदस्य) यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.
या शपथविधी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी शपथविधी मसुद्यातील आशयाचा मागोवा घेतला आणि त्याचे समकालीन महत्व अधोरेखित केले.केंद्र शासन,राज्य शासन,विद्यापीठ,महाविद्यालय आणि विविध संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यासाठी करिअर संसदेने नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.भेदभाव विरहीत,मानसिकदृष्ट्या स्वाथ्यपूर्ण, निर्व्यसनी कर्तृत्व संपन्न युवक घडविण्याचे आवाहन केले.करिअर संसदेत विद्यार्थींनींना सर्व पदावर संधी मिळाली ही बाब अधोरेखित करीत त्यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर कट्टा उपक्रम समन्वयक डॉ.शिवाजी उकरंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपक्रम समन्वयक प्रा.सुहास नागले यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंकज घाटे यांनी केले.बी.एम.एस विभागाच्या विभागप्रमुख प्रा.अश्विनी देवस्थळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.त्याचबरोबर करिअर कट्टा उपक्रमातील सदस्य प्रा.कृष्णात खांडेकर,प्रा.सौरभ भोसले,प्रा.पोटे यांची उपस्थिती होते.या शपथविधी कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Visitors Online : 1