दि. ११ ते १३ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण झोन नं-४ आणि आर्टस आणि सायन्स सावर्डे महाविद्यालय, सावर्डे, चिपळूण, यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण झोन पुरुष महिला टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने सुवर्ण पदक व सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले तर पुरुष संघाने चौथा क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयाच्या सुवर्ण पदक विजेत्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे तसेच सहाय्यक क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं. ४ टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण पदक आणि सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त संघातील विद्यार्थी खेळाडू यांना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन. कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.







Visitors Online : 1