गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सेवक म्हणून कार्यरत असलेले श्री. अंकुश भोगले नियतवयोमानानुसार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छा समारंभ डॉ. ज. शं. केळकर सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाचे सचिव प्रा. महेश नाईक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. अंकुश भोगले १९९४ मध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये रुजू झाले. संस्थेच्या महिला विद्यालय, शिर्के प्रशाला, गोडबोले विद्यामंदिर, महाविद्यालयातील सुरुवातीचे दत्त मंदिर येथील बांधकामात त्यांचा सहभाग होता. महाविद्यालयातील विविध बांधकामे, पाण्याच्या टाकी, कारंजे, बागकाम यामध्ये त्यांनी आपले योगदान दिले. १९९६ पासून संस्थेकडून महाविद्यालयात वर्ग झाल्यानंतर पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कार्यालय अशा विभागात त्यांनी सेवा केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावर मात करीत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सेवा केली.
शुभेच्छा समारंभप्रसंगी संस्थेच्यावतीने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद मंडळाचे सचिव प्रा. महेश नाईक यांनी त्यांचा सत्कार केला तर महाविद्यालयाकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. भोगले यांचा सत्कार केला. यावेळी भोगले यांचे कुटुंबीय उपस्थित होते त्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने गणेशमूर्ती भेट देण्यात आली. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढी कडून श्री. भोगले यांच्या ठेवीच्या रक्कमेचा धनादेश अध्यक्ष श्री. संतोष जाधव यांनी सुपूर्द केला.
याप्रसंगी आपल्या मनोगतात प्रा. महेश नाईक यांनी श्री. भोगले यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकला. परीक्षा विभागामध्ये चोखपणे बजावलेल्या कामाचा त्यांनी उल्लेख केला. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्याच उत्साहात श्री. भोगले यांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवले आजारावर मात केली. इतरांविषयी स्वच्छ मन आणि सुदृढ आरोग्य यांचा संबंध श्री. भोगले यांच्या उदाहरणातून पुढे मांडला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. भोगले यांच्या नियमित कामातील उत्साह, मितभाषीपणा आणि अजातशत्रु या गुणांवर प्रकाश टाकला. नैसर्गिक मूल्यांकानावेळी भोगले यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरील जबाबदारीचे काम त्यांनी केले असे गौरवौद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठोकडेसाई व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. सीमा वीर यांनी केले यावेळी विविध शाखांचे उपप्राचार्य, महाविद्यालयाचे प्रबंधक नंदकुमार गोळपकर, समारंभ समितीचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
![]() |







Visitors Online : 3