gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अश्विनी देवस्थळी यांना ‘पीएचडी’

Dr. Ashwini Deosthal

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. अश्विनी माधव देवस्थळी (एम.कॉम., एम.बी.ए., सेट) यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाची ‘पीएचडी’ पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. देवस्थळी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून आणि २००९ पासून महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील व्यवसाय व्यपस्थापन विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय ‘कौटुंबिक व्यवसायाचे आर्क्टिटेक्चर’ – ‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक आंबा बागायतदारांचा अभ्यास’ असा आहे. सदर शोध निबंध मुंबई विद्यापीठात सादर करण्यात आला होता. त्यांना शोध प्रबंधासाठी मार्गदर्शक म्हणून गोगटे जोगळेकर महविद्यालयातील वाणिज्य विभागातील व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यास्मिन आवटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी देवस्थळी यांनी यापूर्वी विविध नियतकालिकात ५ शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत.

कोकणातील प्रमुख आंबा व्यवसायाशी निगडीत सर्व बाबींचा अभ्यास करून ‘पीएचडी’ पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. अश्विनी देवस्थळी यांचे संस्थास्तरावरून तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.