gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद ICFST-2025’चे हायब्रिड मोडमध्ये दि. 21 व 22 नोव्हेंबर रोजी आयोजन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या र. प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) तर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद (ICFST-2025)चे आयोजन दि. 21 व 22 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. परिषद PM-USHA योजनेअंतर्गत हायब्रिड पद्धतीनेपार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

संस्थेला NAAC कडून ‘A’ श्रेणी (CGPA 3.22) प्राप्त असून UGC CPE टप्पा I व II तसेच DST-FIST मान्यता मिळाली आहे. या परिषदेचा उद्देश देश-विदेशातीलशास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणून विज्ञान-तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींवर चर्चा घडवून आणणे हा आहे. परिषदेच्या उद्घाटनाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि समरोपासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला देश विदेशातील विविध अभ्यासतज्ञ आणि संशोधक उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

परिषदेत खालील विषयांवर संशोधननिबंध सादरीकरण व चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पर्यावरण व संवर्धन जीवशास्त्र, हवामान बदल व जैवविविधता, शाश्वत विकासासाठी जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्रातील नव्या प्रगती, अनुप्रयुक्त गणित व भविष्य तंत्रज्ञान, डेटा अ‍ॅनालिटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञानासाठी मशीन इंटेलिजन्स, हरित रसायनशास्त्र व पर्यावरणीय शाश्वतता, प्रगत पदार्थविज्ञान व नॅनोसायन्स, आरोग्य व औषधातील रासायनिक प्रगती आणि पारंपरिक ज्ञान व वनौषधी या विषयांचा समावेश असून त्यावर सादरीकरण आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

या परिषदेमुळे वैज्ञानिक क्षेत्रात आंतरसंशोधन, तंत्रज्ञानातील सहकार्य आणि नवोन्मेषी कल्पनांची देवाणघेवाण वाढण्यास मदत होईल तसेच देश-विदेशातील संशोधकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळेल’ अशी अपेक्षा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.