गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्य घटनेवर आधारित विविध राज्यशास्त्रविषयक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. प्रविंद बिरादार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, कला शाखा उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील, गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी संविधान दिनाचे महत्व विषद करून ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ आणि वाचन साहित्याचा सर्वांना परिचय व्हावा यादृष्टीने सातत्याने ग्रंथालयातर्फे नाविन्यपूर्ण तसेच वाचकाभिमुख उपक्रम हाती घेतले जातात; असे सांगून महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये घेण्यात येणारे विविध वाचन प्रेरक उपक्रम, वाचन साहित्य संग्रह आणि ग्रंथालयाची कार्यपद्धती या बाबींचा आढावा घेतला.
दोन दिवस खुले ठेवण्यात आलेल्या या ग्रंथ प्रदर्शानाला प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 0