gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्ही. के. बावडेकर व्याख्यानमालेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य तसेच माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. व्ही. के. बावडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे करण्यात आले आहे.

विद्यमान वर्ष हे व्याख्यानमालेचे ४०वे पुष्प असून यासाठी ज्येष्ठ कीटक तज्ज्ञ व मित्र किडा बायोसोल्यूशन्स आणि मित्र किडा फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक डॉ. राहुल मराठे व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या विज्ञान व्याख्यानमालेसाठी सर्व विज्ञान तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.