गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘सावित्रीच्या ज्योती’ या भित्तिपत्रकाचे दि. ३ जानेवारी रोजी अनावरण झाले. उपप्राचार्या डॉ. सीमा कदम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या भित्तिपत्रकाला यावर्षी तीन वर्षे पूर्ण झाली. सावित्रीच्या ज्योती भित्तिपत्रक कार्यक्रमाचे अनावरण विज्ञान शाखा आणि वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.
सावित्रीच्या ज्योती भित्तिपत्रक अनावरण कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येत उस्फुर्त सहभाग होता. तृतीय वर्ष वाणिज्यमधील कु. वैष्णवी पवार हिने कविता सादर केली व द्वितीय वर्ष वाणिज्यमधील कु. लीना नांदगावकर या विद्यार्थिनीने तिचे मनोगत व्यक्त केले. डॉ. चित्रा गोस्वामी तसेच वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रा. रसिका नाचणकर यांनी सूत्रसंचालन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
![]() |

