रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस वर्धापन दिनाचे (रेझिंग डे) निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले गेले. याचा उद्देश शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थांना पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती होणे, पोलीस व समाजातील जवळीकता वाढविणे हा होता. शस्त्रांची माहिती देणे, श्वान पथकातील प्रत्येशिक , संवेदनशील काळात पोलिसांचे कार्य, स्व सुरक्षा विषयक उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालायातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी रस्ते सुरक्षा विषयक पथनाट्य सदर करून रस्ते अपघात, हेल्मेटचा वापर, वाहतुकीच्या नियमाचे पालन, रस्त्यावरील शिस्त आणि सुरक्षा विषयक उदबोधन आपल्या पथनाट्यातून केले.
PSI क्रांती पाटील, API तुषार जाधव, PSI भूषण हांडोरे, PSI मोरे, PSI अरुण जाधव यांचेसोबतच पोलीस दलातील अनेक मान्यवर पोलीस अधिकारी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी हजर होते. अदिती कुळये, रिया कुळये, पूर्वा चव्हाण, सार्थक सावंतदेसाई, साहिल शिंदे, आर्यन जमादार, अवधूत रेवाळे, दिव्या कीर, श्रेयस रसाळ, ऋषिकेश वाडेकर, पल्लवी निंबरे, रुद्रप्रताप जाधव, मानस कांबळे या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादरीकरण केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे या कामगिरीसाठी विशेष कौतुक केले.
