गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागात पी एम उषा योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय ‘कौशल्य वृद्धी कार्यक्रम’ नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला. दि. ५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या अभ्यासक्रमाचे आयोजन जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने करण्यात आले होते. या अभ्यासक्रमात ४० विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मान्यवर आणि संसाधन काक्ती म्हणून समर्थकृया लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सावर्डे’च्या संचालिका डॉ. रित्ता मुल्हेकर, संशोधक डॉ. संपदा लेले, अंकिता बेंद्रे, शर्वाणी डोळे तसेच त्यांचे सहकारी मानसी बेंडल व प्रणाली दयाळकर हेही उपस्थित होते. कार्यमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखा उपप्राचार्या तथा तथा पीएमउषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी व उपक्रम समन्वयक तथा जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख मान्यवर डॉ रिना मुल्हेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले व प्रात्याक्षिक कौशल्यांची गरज नमूद केली. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ही प्रयोग कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकप्रसंगी प्रा. रश्मी भावे यांनी या क्षेत्रातील करिअरसाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसुन विविध प्रात्यासिक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. अपर्णा कुलकर्णी या कौशल्य आधारित कार्यशाळेचे औद्योगिक क्षेत्रातील करिअसाठीचे महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. समिधा शिंदे यांनी केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पूर्व-चाचणी घेऊन अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. पाच दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष हाताळणी प्राक्षिण घेतले. यामध्ये प्रामुख्याने मोलिक्युलर बायोलॉजी, दिएनए एक्स्ट्रॅक्शन, पीसीआर, इलेक्ट्रोफोरेसिस, अॅनिमल टिश्यूकल्चर इ. विषयांचा समावेश होता. यामध्ये वरील विषयांवर व्याख्याने व प्रत्यक्ष प्रशिक्षणे घेण्यात झाली. कार्यशाळेच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली; ज्यामध्ये त्यांचे कार्यशाळेतील सक्रिय योगदान व त्याअनुषंगाने आत्मसात केलेले ज्ञान याचे मूल्यांकन करण्यात आले.
कार्यशाळेच्या अंतिम दिवशी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रमुख मान्यवर व प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्त्यांनी आपली मनोगते मांडली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी भावे यांनी केले. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या प्रयोगात्मक कौशल्य वृद्धीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या या याशाश्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. तसेच जैवतंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेदेखील या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.






Visitors Online : 0