gogate-college-autonomous-updated-logo

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विविध उपक्रम

वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६ या वाचनाला प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कथा, कविता सांगून तसेच सामुहिक वाचन, पुस्तक भेट देऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी आपला सहभाग दिला. येथील अ. के. देसाई हायस्कूल येथे कु. शर्विल रांभाडे आणि कु. श्रेयस रसाळ यांनी मराठी भाषेतील गोष्टी सांगितल्या. केळ्ये येथील अंगणवाडीत कु. पूर्वा चव्हाण हिने कविता व गोष्टी सांगून बालकांना वाचनासाठी प्रेरित केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. उमा जोशी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थांना पुस्तकांचे वाटप केले. ग्रंथपाल डॉ. किरण धांडोरे यांनी याकामी सहकार्य केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा वाचन संकल्प अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी सुरु आहे.

Comments are closed.