मराठी विज्ञान परिषद (मविप) समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे काम करते. परिषद एकूण ४ राज्यात कार्यरत असून ७१ विभाग सक्रिय आहेत. महाराष्ट्रात मविप प्रामुख्याने मराठीत काम करते. तथापि, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कार्यक्रम इतर भाषांमध्ये देखील आयोजित केले जातात.
दि. २२ डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त अ. के. देसाई विद्यालयामध्ये गणितीय प्रतिकृती बनवणे कार्यशाळा दि. १७ व २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेत एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्वतः गणितिय प्रतिकृती बनवून त्याचे प्रदर्शन केले. सदर कार्याशाळेस माजी गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे, प्रा. श्रद्धा सुर्वे व प्रा. स्पृहा जोशी (दीप्ती वाकणकर) यांनी मार्गदर्शन केले.
यासोबतच जनसामान्याकरिता गणित या उपक्रमांतर्गत ‘गणित विषयाची जनजागृती’ या विषयावर प्रा. उमा जोशी व प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी व्याख्यान व विशेष उपक्रमाद्वारे माहिती दिली. या कार्यक्रमात २० महिला उपस्थित होत्या. व्याख्याना सोबत उपस्थितांची प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. हा उपक्रम तिवंडेवाडी स्वरुपानंदनगर येथील ‘जागृती महिला ग्रामसंघ’ या महिला बचतगट प्रातिनिधी यांचे सहकार्याने घेण्यात घेण्यात आला.
या सर्व कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश संकपाळ, गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे व समाजशास्त्र विभागातील प्रा. सचिन सनगरे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व उपक्रमास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून अनुदान प्राप्त होते. सदर उपक्रमातून गणित विषय अधिक लोकप्रिय करण्यात व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यात मराठी विज्ञान परिषदेचे सभासद यशस्वी होत आहेत.
![]() |
![]() |


