गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य तसेच माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. व्ही. के. बावडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. विद्यमानवर्षी या व्याख्यानमालेचे ४०वे पुष्प दि. १४ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ज.शं.केळकर सेमिनार हॉल येथे डॉ. राहुल मराठे, संस्थापक आणि संचालक, मित्रकिडा बायोसोल्युशन आणि मित्रकिडा फाऊंडेशन, यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले. कीटकशास्त्र: काल, आज आणि उद्या हा यंदाच्या व्याख्यानमालेचा विषय होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रा. बावडेकर सर यांच्या महाविद्यालयातील विशेष आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला प्रा. वनश्री तांबे यांनी प्राचार्य व्हि. एन बावडेकर यांच्या महाविद्यालयीन कार्याची ओळख करून दिली. प्रा. बाबा सुतार यांनी प्रमुख व्याख्याते यांचा परिचय करून दिला. व्याख्यानादरम्यान डॉ. मराठे यांनी कीटक भ्रमंती फायदेशीर कीटक, घन कचरा विल्हेवाट, कीटकांचा वापर करून पूर्वसूचना प्रणाली, पर्यावरणीय स्थिरीकरण, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, पर्यावरणीय पुनर्संचयित, कृत्रिम बुद्धिमत्ता, वृक्ष जोखीम मूल्यांकन,कीटक व्यवस्थापन प्रशिक्षण या कीटकांवर आधारलेल्या नवोदित क्षेत्रांची माहिती करून दिली.
त्यांच्या विविध संशोधनातून उपयुक्त ठरलेल्या प्लास्टिक किडा,काळी सैनिकी माशीची घनकचरा व्यवस्थापनामधील भूमिका, विमान-अवकाश सुरक्षा, निःशस्त्रीकरणासाठी कीटकांचा वापर,कीटकांचा वापर करून स्फोटकांचा शोध, शेतीतील फायदेशीर कीटक यासंदर्भातील आश्चर्यकारक गोष्टी त्यांनी उलघडल्या. या कार्यक्रमाप्रसंगी नूतन कर्णिक मित्रकिडा बायोसोल्युशन आणि मित्रकिडा फाऊंडेशनच्या सदस्या यादेखील उपस्थित होत्या. व्याख्यानमालेत महाविद्यालयाच्या विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी तसेच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे, माजी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी एस कुलकर्णी व डॉ. मंगल पटवर्धन तसेच विज्ञान शाखेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की संशोधनात्मक कार्य होण्यासाठी आपल्या महाविद्यालयात अशा कीटकशास्त्रावर आधारलेल्या संशोधनात्मक अभ्यासक्रमांची निर्मिती होणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा सुर्वे तर आभार डॉ. मोहिनी बामणे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन प्रा. निशा केळकर, प्रा. सनील सावले डॉ. प्रतीक्षा बारसकर यांनी केले. तांत्रिक मदत प्रा. परेश गुरव यांनी केली.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |





