गोगटे जोगळेकर महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त दि. ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ८.०० वाजता ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत देशाच्या एकसंघ करण्यामधील महान योगदाना संदर्भात विवेचन केले. सरदार पटेल यांचे स्वातंत्र लढ्यातील नेतृत्व तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध संस्थानांच्या विलीनीकरणामध्ये त्यांनी दाखविलेला कणखरपणा याची आठवण आपण सर्वजणांनी ठेवली पाहिजे असे प्राचार्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये नमूद केले.
यावेळी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच क्रीडा विभागाचे विविध खेळाडू यांनी सदर एकता दौडमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.