गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी च्या पुरूष व महिला क्रॉस कंट्री संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्रॉसकंट्री १० कि. मि. धावणे स्पर्धेत २०२६ चे रौप्यपदक प्राप्त केले आणि शैक्षणीक वर्ष २०२५-२६ चे सांघिक उपविजेते पद पटकाविले. दि. ६ ते ७ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं. – ४ आणि डी. जी. तटकरे आर्ट्स आणि कॉमर्स महाविद्यालय तळा, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोंकण विभाग पुरूष व महिला क्रॉसकंट्री १० कि. मी धावणे २०२५-२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वरील स्पर्धेत महाविद्यालयाच्या पुरूष व महिला क्रॉस कंट्री संघाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग नं. ४ पुरूष व महिला क्रॉस कंट्री स्पर्धा- २०२५-२६ चे रौप्य पदक प्राप्त करीत मुंबई विद्यापीठ अंतर्गत क्रॉस कंट्री १० कि. मि. धावणे पुरूष व महिला स्पर्धेतील उपविजेतेपद आणि रौप्य पदक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
![]() |

