भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय राज्य घटना, भारतीय लोकशाही आणि भारतीय राजकीय व्यवस्था या विषयावर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश पाटील, इंग्रजी विभागाचे प्रा. डी. एस. कांबळे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने केले.
भारतीय राज्य घटना, लोकशाही आणि राजकीय व्यवस्था या विषयावरील निवडक ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस वाचकांसाठी खुले राहणार आहे. याप्रसंगी मान. प्राचार्यांनी सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
![]() |
![]() |
![]() |








Visitors Online : 1