गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये
“खगोल अभ्यास कार्यशाळा आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा”
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रामार्फत घेतल्या जाणाऱ्या खगोल अभ्यास कार्यशाळेच्या अनुषंगाने माविद्यालयीन विद्यार्थांसाठी “पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. दि. ११ डिसेंबर २०१६ या दिवशी सदर स्पर्धा होणार असून भारताची अवकाश मोहिम, विश्वाची निर्मिती, दीर्घिका आणि तारकापुंज, अवकाशातील प्रदूषण, विश्वाचे प्रसारण, ग्रहणे यापैकी एका विषयावर १० मिनिटे सादरीकरण सरावयाचे आहे.
खगोल अभ्यास कार्यशाळा दि. ६ ते १२ डिसेंबर २०१६ या कालावधीत होणार असून कल्याण येथील नामवंत खगोल अभ्यासक प्रा. हेमंत मोने हे या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. खगोल अभ्यासाची आवड असणारे कोणतीही व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकेल. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी खगोल अभ्यास केंद्र, द्वारा भौतिकशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे अथवा ९४२११३९२९६ (डॉ. विवेक भिडे), ९७६४९३२६०४ (प्रा. आज्ञा शिरगावकर) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.