गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ (स्थानिक) सचिवपदी जयदीप परांजपे याची सन २०१६-१७ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे.
जयदीप हा राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभागातील असून त्याने या विभागात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सध्या तो तृतीय वर्ष वाणिज्य विभागात शिकत असून पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय कॅम्प मध्ये गायन, लोकनृत्य मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात राजपथ येथे सहभागी, सेलिंग कॅम्प मध्ये सुवर्णपदक, कॅडेट कॅप्टन ही रॅक प्राप्त केली आहे. महाविद्यालाचा वर्ष २०१५-१६ करिता आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार प्राप्त.
जयदीप याच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
जयदीप परांजेपे याचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, (डावीकडून) निवडणूक अधिकारी डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी उपप्राचार्य (विज्ञान विभाग) डॉ. मिलिंद गोरे, आणि प्रबंधक श्री. मोहन कांबळे.