गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैव विविधता संगोपन व संवर्धनाच्या संधी’ या विषयावर नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. अनुराधा उपाध्ये, शास्त्रज्ञ बायोडायव्हरसिटी, आघारकर शंशोधन संस्था यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. उपाध्ये त्यांच्या काही सहकार्याबरोबर संस्थेच्या होत असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच कोकणामध्ये औषधी वनस्पती फार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याची या भागातील विद्यार्थ्यांना माहिती असण्याची तसेच त्यांचे जनन व संवर्धन करण्याची गरज विद्यार्थ्यांना समजून दिली. तसेच यासंदर्भात अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत हेदेखील विषद केले.
वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. मंगल पटवर्धन यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे यांच्या हस्ते डॉ. उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश जाधव याने तर कु. पूजा हिने आभार मानले.
याच दौऱ्याच्यावेळी वनस्पती शास्त्र विभागातील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष जंगलात जाऊन तेथील औषधी वनस्पतींची पाहणी डॉ. उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली केली.