महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) तर्फे Skill Development Catalyst (SDC) – Business Development Executive (BDE) या पदासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी Campus Interview (प्रथम फेरी) आयोजित करण्यात आले आहेत. याकरीता मुलाखती बुधवार दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे कॉमर्स बिल्डिंग येथे संपन्न होणार आहेत. MKCL च्या विविध कौशल्य विकास व रोजगाराभिमुख उपक्रमांसाठी पात्र आणि उत्साही युवकांची निवड करण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना Business Development Executive (BDE) या भूमिकेत कार्य करण्याची संधी मिळणार आहे.
या पदामध्ये विद्यार्थी व पालक मार्गदर्शन, शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती प्रसारित करणे, नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी मदत करणे, शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधणे, मार्केटिंग व आऊटरीच उपक्रमांचे नियोजन करणे तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सहभाग घेणे अशा विविध जबाबदाऱ्या असतील. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असून २०२३, २०२४, २०२५ किंवा २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. उत्कृष्ट संवाद कौशल्य, प्रभावी सादरीकरण कौशल्य आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी अद्ययावत बायोडेटा, आधार कार्डची प्रत, शैक्षणिक गुणपत्रिका, लिविंग सर्टिफिकेट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
दि. २४ जून रोजी सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असून उमेदवारांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच MKCL कोकण विभाग समन्वयक श्री. संतोष कोलते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष कोलते MKCL कोकण विभाग समन्वयक मोबा. 9890414170 व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई मोबा. 9421142529 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.




Visitors Online : 0