रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सूक्ष्म व्यायाम,योगासने,प्राणायाम,ध्यान अशा विविध प्रकारांच्या प्रात्यक्षिक आणि सामूहिक सराव करून साजरा करण्यात आला.भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.
यावर्षी विविध शाखा आणि विभागांच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित केलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब करण्यात आला. महाविद्यालयाच्या पानवलकर बॅडमिंटन हॉलमध्ये राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संगणकशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, वाणिज्य शाखा यामधील विद्यार्थ्यांचे गटनिहाय योग प्रात्यक्षिक करून सराव सामूहिक सराव करून घेण्यात आला.शिवयोग अकादमी,रत्नागिरी येथील श्री. दुर्वांकूर चाळके यांनी योग प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाची पार्श्वभूमी मांडली.आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या अपेक्षा, येणारी निराशा तणाव निर्माण करीत आहेत अशावेळी तणावमुक्त जीवनासाठी योग एक महत्वपूर्ण साधन आहे. निरोगी मन, निरोगी शरीर यामधूनच व्यक्तिमत्व घडते. भारताची योगविद्या ही भारताचे संचित आहे, योगसाधना करून आपण सर्वांनी ते जपू या असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संगणकशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, वाणिज्य शाखा यामधील विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले.
दुसरीकडे कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ.कल्पना आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वर्गखोल्यांमधून गटनिहाय योग प्रात्यक्षिक आणि सराव करून घेण्यात आला. प्रा. मधुरा दाते (इंग्रजी विभाग), प्रा. प्रणाली मांजरेकर (इंग्रजी विभाग), प्रा. प्रज्ञा भट (संस्कृत विभाग), प्रा. स्नेहा शिवलकर (संस्कृत विभाग), प्रा. सीमा वीर (मराठी विभाग) आणि प्रा. निलेश पाटील (राज्यशास्त्र विभाग) यांनी विद्यार्थ्यांना सूक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यानविषयक मार्गदर्शन करीत योग प्रात्यक्षिक करून दाखवली. यावेळी कला शाखेतील सर्व प्राध्यापक सहकार्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
![]() |








Visitors Online : 0