दि. २३ जुलै २०२६ वन संवर्धन दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्र विभाग व माहिती तंत्रज्ञान (IT) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने OE (Open Elective) अभ्यासक्रमांतर्गत अनुभवाधारित शिक्षण (Experiential Learning) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. परेश गुरव व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये FYBSc IT विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नैसर्गिक अधिवासातील बेहडा (Terminalia bellirica) या वृक्षाची रोपे ग्रो बॅगमध्ये पुनर्लागवड करून त्याच्या संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच माहिती तंत्रज्ञान विभागातील अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप दत्तक घेऊन त्याचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली. प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे महत्त्व पटवून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती उत्तरदायित्वाची भावना विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
![]() |
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 1