‘पदवीदान समारंभ विद्यार्थ्याच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतो. आपल्या यशाच्या मागे अनेक भागीदार असतात. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी समर्थपणे आणि जबाबदारीने वापर करणे महत्वाचे आहे. एआय, वातावरण बदल, जागतिकीकरण यामुळे समाजाचा आयाम बदलत आहे, त्या बदलाचा आपण एक संदर्भ बनावे. ईशोपनिषदातील वचनात सांगितल्याप्रमाणे ज्ञानातून सत्याचा धर्म, खऱ्याचा रस्ता दाखविण्याचे काम व्हावे’, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विवेक बेल्हेकर यांनी केले. गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी प्रदान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंतांना यावेळी गौरवण्यात आले. अध्यक्षीय भाषणात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘माणुसकी नाही तर माणूस कुठला असा प्रश्न उपस्थित करत शिक्षणातून माणुसकीची जोपासना व्हावी! उद्या कधीच उजाडत नाही म्हणून ठरवलेली गोष्ट आजच करा. जे आपल्याकडे नाही ते शिकण्याचा प्रयत्न करा. यश प्रामाणिक कष्टांनी मिळवा आणि त्या यशाने लोकांचे जगणे सुकर करा’ असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.
डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्यातील सद्गुणांची जोपासना करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयातून पदवी घेऊन जाताना एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्याचे आणि आई-वडील, कुटुंब आणि शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञ राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे आणि पदवीधारक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |










Visitors Online : 2