gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत) महिला संघाने पटकावली सुवर्णपदकासह महिला बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक तर पुरुष संघास कांस्य पदक

मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग बॅडमिंटन २०२६-२७ या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत) रत्नागिरीच्या महिला संघास सुवर्ण पदकासहित महिला बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक तर पुरुष संघाने कांस्य पदकाची कमाई केली आहे. कोंकण विभाग व डॉ. आबासाहेब मराठे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, हातिवले, ता. राजापूर यांच्या संयुक्तविद्यमाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्र. ४ आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक प्राप्त केला. कोंकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद प्राप्त करीत विजेतेपदाची हॅट्रिक साधली आहे. तर पुरुष संघाने कांस्य पदक प्राप्त करून तिसरा क्रमांक प्राप्त केला.
सुवर्णपदकप्राप्त महाविद्यालयाच्या महिला बॅडमिंटन विजयी संघात कु. श्रुति फणसे (एम.ए.भाग-२); कु. चार्वी कापडी (द्वितीय वर्ष वाणिज्य) कु. तन्वी घाणेकर (एम.कॉम भाग-१); कु. श्रावणी शिंदे (द्वितीय वर्ष बायोटेक); कु. गौरवी गावडे (द्वितीय वर्ष बायोटेक) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तर कांस्य पदक प्राप्त महाविद्यालयाच्या पुरुष बॅडमिंटन संघात कु. सिद्धेश फणसेकर (एम.कॉम भाग-१); कु.अथर्व कारेकर (एम.बी.ए.); कु. आदित्य शिर्के (तृतीय वर्ष विज्ञान); कु. परेश तळेकर (एम.बी.ए.); कु. शौनक भावे (एम.कॉम. भाग-२); कु. आकाश पालवे (प्रथम वर्ष कला); कु. सलील कांबळे (प्रथम वर्ष वाणिज्य) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या पुरुष व महिला बॅडमिंटन संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्री. माधव फणसे यांचे सहकार्य लाभले.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्र. ४ बॅडमिंटन महिला स्पर्धेत सुवर्ण पदक व विजेतेपद विजेतेपदाची हॅट्रिक साधणाऱ्या महिला संघाला तसेच कांस्य पदक प्राप्त पुरुष बॅडमिंटन संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.