गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०१६’ हा युवा सांस्कृतिक महोत्सव खातू नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. या महोत्सवाच्या सोर्वोत्कृष्ट व्यवस्थापानासाठी ‘महाराजा करंडक’ देण्यात येतो. यावर्षी तृतीय वर्ष कला शाखेला ‘जीजेसी अवार्ड नाईट’ या वार्षिक बक्षिस समारंभाच्या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने केलेल्या संयोजनाबद्दल हा करंडक प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग आणि विजेतेपदे प्राप्त केल्याबद्दल द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गाने ‘क्लास चॅम्पीयनशिप’ पटकावली. ‘झेप-२०१६’ या युवा सांस्कृतिक महोत्सवातील सर्व स्पर्धांचे मान्यवर परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. यावर्षीच्या झेप युवा सांस्कृतिक महोत्सवाकरिता ‘गो डिजिटल’ अशी थीम ठरविण्यात आली होती.
तसेच पर्सनॅलिटी कॉन्टेस्टमध्ये अजिंक्य कोल्हटकर ‘कॉलेज किंग’ तर गौरी हर्षे ‘कॉलेज क्विन’ झाली. रोझ किंग विपुल नलावडे तर कु. शिजा कापडी रोज क्विन ठरली. चॉकलेट किंग विनीत पटवर्धन तर कु. प्रियांका परांजपे चॉकलेट क्विन ठरली. महाविद्यालयाचा गोल्डन बॉय अजिंक्य कोल्हटकर तर गोल्डन गर्लचा किताब कु. दिशा आंबुलकर हिला मिळाला. प्रिया पेडणेकर उत्कृष्ट निवेदक प्रथम, मैत्रयी बांदेकर द्वितीय आणि श्वेता खानविलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
‘गोगटे जोगळेकर श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धेत रोशन करमरकर विजेता ठरला. ओंकार कीर द्वितीय तर पुष्कराज सावंत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
सर्व विजेत्यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक प्रा. उदय बोडस, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, झेपचे समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप परांजपे, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच महाराजा ग्रुपचे श्री. प्रशांत बापर्डेकर, श्री. राजेश जाधव, श्री. संदेश कीर, सौ. राजेश्री शिवलकर उपस्थित होते.