विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निघालेल्या परिपत्रकानुसार शैक्षिणक वर्ष 2023-24 पासून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना APAAR ID असल्याशिवाय त्यांची गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थांनी APAAR ID नोंदणीसाठी अद्ययावत आधार कार्ड असणे जरुरीचे आहे. मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आधारकार्ड संदर्भात शिबिराचे सोमवार दि. ०५ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दु. ३.३० या वेळेत आयोजिन करण्यात आले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत, समूह (cluster ) महाविद्यालयातील विद्यार्थानाही याचा लाभ घेता येईल .
ज्या विद्यार्थी /विद्यार्थिनी नी आधारकार्ड मधील त्रुटींमुळे APAAR ID / ABC ID काढलेला नाही त्यांनी आपले आधार अद्ययावत करून APAAR ID काढून त्याची नोंद करावी. यापुढे गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी APAAR / ABC ID असणे आवश्यक आहे. सदर सुविधेचा संबंधित विद्यार्थांनी लाभ घेऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करावे तसेच आपली APAAR ID / ABC ID (Automated Permanent Academic Account Registry,/ Academic Bank of Credit ID) नोंद पूर्ण करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.