gogate-college-autonomous-updated-logo

Literary Association

वाङ्मय मंडळ

महाविद्यालयात संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषांचे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर अध्यापन केले जाते. बदलत्या काळानुसार जागतिकीकरणाचं भान भाषेला देणाऱ्या आणि तिचं भाषापण जगभर नेणाऱ्या सर्वांसाठीच महाविद्यालयाचे वाङ्मय मंडळ कार्यरत आहे.

उद्देश :

विद्यार्थ्यांमध्ये साहित्याभिरुची निर्माण करणे
विद्यार्थ्यांना सृजनशील लेखनासाठी प्रवृत्त करणे
भाषांभाषांमध्ये आंतर-शाखीय संबंध प्रस्थापित करणे
साहित्यविषयक संशोधनासाठी प्रवृत्त करणे
साहित्यसंमेलने, ग्रंथप्रदर्शनांना डोळस भेट देणे
विविध भाषादिन नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे करणे

२७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज जन्मदिन 'मराठी भाषा दिन' साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे 'मातृभाषा : अभिव्यक्तीचे चिरंतन माध्यम' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यानिमित्ताने पंचभाषाकाव्य सादरीकरण, भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
२४ जुलै रोजी 'एक तरी वारी अनुभवावी' हा विद्यार्थ्यांच्या वारी आणि अभंगगायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कवी प्रकाश घोडके यांच्या काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरीसाठी ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची सदस्यता नोंदणी करण्यात आली.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर काव्य सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये
प्रथम क्रमांक – सायली खेडेकर,
द्वितीय क्रमांक – सायली पिलणकर,
तृतीय क्रमांक – किरण जोशी,
उत्तेजनार्थ – गौरी सावंत
यांनी पारितोषिके पटकावली.
८ ऑगस्ट रोजी संस्कृत दिनानिमित्त डॉ. सिद्धार्थ वाकणकर यांचे 'आधुनिक भारतीय भाषा आणि संस्कृत' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
२२ सप्टेंबर रोजी हिंदी दिनाचे औचित्य साधून 'हिंदी भाषा और रोजगार' या विषयावर डॉ. मिलिंद कदम, उपप्राचार्य, पटवर्धन प्रशाला, रत्नागिरी यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले.
कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित 'तरंगते साहित्य संमेलन' या कार्यक्रमात भाग्यश्री संसारे, भूषण दातार आणि गौरी सावंत या विद्यार्थ्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड झाली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ठाणे येथे झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात सायली पिलणकर हिच्या कथेस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
'झेप' या वार्षिक महोत्सवात 'स्टेज इव्हेंट' प्रकारात काव्याभिवाचन स्पर्धा आयोजनास प्रथम पारितोषिक मिळाले.
वर्षभरामध्ये काव्यलेखन, वक्तृत्त्व, निबंध, अभिनय या विविध स्पर्धांमध्ये वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश मिळवले.

२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन संपन्न/ मर्मबंध ग्रुप यांचा कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारित 'गंध दरवळे काव्याचा' हा नृत्य-नाट्य-काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम
५ मार्च – 'उर्दू दिन' नझीर फतेहपुरी (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक) यांच्या नज्म सादरीकरणाचा कार्यक्रम व उर्दू विभाग प्रमुख प्रा. दानिश गनी यांच्या 'परिंदे तो मुसाफिर हैi I ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
१५ ऑगस्ट – देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत वाङ्मय मंडळाच्या सहभागी संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
१ सप्टेंबर – संस्कृत दिनानिमित्त 'संस्कृत भाषा आणि प्रसारमाध्यमे' या विषयावर अभिनेत्री समीरा गुजर यांचे व्याख्यान
८ सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने उर्दू विभागाचा प्रसिद्ध कवी इक्बाल सालिक यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम
१४ सप्टेंबर – हिंदी दिनानिमित्त 'हिंदी काव्यमें दोहे का महत्त्व' या विषयावर श्रीमती स्मिता राजवाडे यांचे व्याख्यान
१८ ऑक्टोबर – को. म. सा. प. आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
२३ डिसेंबर – काव्य अभिवाचन स्पर्धा – 'झेप' महोत्सवात महिला विकास कक्षाच्या संयुक्त विद्यमाने 'लिंगसमभाव' या विषयावर काव्य अभिवाचन स्पर्धा
२४ जानेवारी - को. म. सा. प. च्या साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचा कवी म्हणून सहभाग तसेच गौरी सावंत या विद्यार्थिनीचे युवा संमेलन प्रमुख म्हणून कार्य
२९, ३० आणि ३१ जानेवारी – सावरकर साहित्य संमेलनात वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
निबंध लेखन तसेच अन्य वाङ्मयीन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन संपन्न, प्रथितयश लेखक अविनाश बिनीवाले यांचे 'विविध भाषा, भाषिक कौशल्ये आणि रोजगार संधी' या विषयावर व्याख्यान संपन्न
२८ जुलै – प्रख्यात कवी अजय कांडर यांच्या हस्ते 'मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन' आणि 'कवी आपल्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन
३० जुलै – संस्कृत विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'शोधनिबंध' लेखनाची एक दिवसीय कार्यशाळा – मार्गदर्शक डॉ. विद्याधर करंदीकर
१५ ऑगस्ट – देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत वाङ्मय मंडळाच्या संघाला प्रथम क्रमांक
१४ सप्टेंबर – हिंदी दिनानिमित्त 'जनसंचार माध्यम और रोजगार' या विषयावर श्री. शैलेश माळोदे यांचे व्याख्यान
७ ऑक्टोबर – कवी केशवसुत यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त केशवसुत स्मारक, मालगुंड येथे वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांचे काव्यवाचन
२३ ते २५ डिसेंबर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रतिभासंगम विद्यार्थी साहित्य संमेलनात ललित लेखन प्रकारात विजय बिळूर याला द्वितीय पारितोषिक, कार्यक्रमाच्या आयोजनात विजय सुतार या विद्यार्थ्याचा सहभाग तसेच अन्य विद्यार्थ्यांचे काव्यवाचन
१३ जानेवारी – मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त लेखक-कवी अॅड. विलास कुवळेकर यांचे 'मराठी भाषा संवर्धन' या विषयावर व्याख्यान
२५ व २६ फेब्रुवारी – महाराष्ट्र साहित्य परिषद, रत्नागिरी शाखा आयोजित युवा साहित्य व नाट्य संमेलनात प्रथम वर्ष कला शाखेच्या विजय सुतार या विद्यार्थ्याने कवी संदीप खरे यांची मुलाखत घेतली. निमंत्रितांच्या कवी संमेलनात विजय बिळूर, शार्दुल रानडे, विजय सुतार आणि मराठी विभागातील प्रा. सायली पिलणकर यांचा सहभाग.
२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन संपन्न, मा. उदय पंडित, कणकवली यांचे व्याख्यान तसेच कीर्तन, बोलींची जत्रा हे नाटक, काव्याभिवाचन, भारुड यांचे सादरीकरण
विविध निबंध, पत्रलेखन स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण शिबीर तसेच अन्य वाङ्मयीन उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग

७ ऑगस्ट – प्रख्यात कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
१५ ऑगस्ट - देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत वाङ्मय मंडळाच्या संघाला प्रथम क्रमांक
१४ सप्टेंबर – हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त प्रिया पेडणेकर, तैबा बोरकर आणि सबा बंदरी यांचे अनुभवकथन
१३ डिसेंबर – साने गुरुजी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा, ओणी येथे विजय बिळूर आणि विजय सुतार यांना तृतीय पारितोषिक
१८, १९, २० जानेवारी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रतिभासंगम विद्यार्थी साहित्य संमेलनात
काव्यलेखन प्रकारात विजय बिळूर याला प्रथम पारितोषिक,
कथालेखन प्रकारात सबा बंदरी हिला प्रथम तर
शार्दुल रानडे यास उत्तेजनार्थ पारितोषिक,
वैचारिक लेखन प्रकारात तैबा बोरकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक
२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिनानिमित्त प्रा. जयश्री बर्वे यांचे व्याख्यान आणि विद्यार्थ्यांचे काव्यवाचन