गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न झाला. सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला यानंतर झालेल्या सोहळ्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यांची वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ रसायनशास्त्र विभाग प्रमुख आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांना तर कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ एफ.पी.टी. विभागप्रमुख प्रा. महेश नाईक यांना प्राप्त झाला. तर श्री. कृष्णा आलीम यांना ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचा आदर्श शिक्षक वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सुनील भोईर यांना तर वरिष्ठ महाविद्यालयातील कु. जान्हवी जोशी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कु. वरदा मयेकर यांना आदर्श विद्यार्थी वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाने वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला आणि नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विविध क्षेत्रात महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे सुयश हे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांचेच आहे असे नामुक केले.
वरिष्ठ आणि कनिष्ठ माविद्यालायातील प्राध्यापक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले.
![]() |
![]() |
![]() |



