गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एड्स जनजागृती २०२१’ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला; यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. नितीन पोतदार, जैवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा घड्याळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भित्तीपत्रकस्पर्धा, शॉर्टफिल्म मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ३४ भित्तीपत्रके आणि ०५ शॉर्टफिल्म प्रदर्शित केल्या गेल्या.
भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम क्रमांक यग्येशा गमरे, जाहीन कलंगडे, केतकी मांडवकर (एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र-२) द्वितीय क्रमांक सानिका बर्गे, अष्टगंधा वर्तक, गिरीजा गुरव, सुरभी गावडे (प्रथम वर्ष बोयोकेमिस्ट्री) आणि तृतीय क्रमांक भार्गवी आपटे, साईराज शेलार, संकेत सांगावकर (द्वितीय वर्ष सूक्ष्मजीवशास्त्र) यांनी सुयश प्राप्त केले. शॉर्टफिल्म मेकिंग स्पर्धेत ‘रिमुव्ह अॅड’ या द्वितीय वर्ष सूक्ष्मजीवशास्त्र टीमला प्रथम क्रमांक, ‘पॉझिटीव्ह’ या शॉर्टफिल्मला द्वितीय तर ‘बूमरँग’ या शॉर्टफिल्मला तृतीय वर्ष सूक्ष्मजीवशास्त्र चमूला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
एड्स जनजागृती कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे डॉ. प्रत्युष चौधरी, न्यूरोसर्जन, निर्मल बालरुग्णालय, रत्नागिरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी एड्सबद्दल असलेल्या समजुती स्पष्ट केल्या, त्याचबरोबर स्वत:चे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव विषद केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी तसेच शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.