gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जागतिक एड्स जनजागृती दिन’ विविध उपक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रत्नागिरी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक एड्स जनजागृती दिना’चे औचित्य साधून दोन दिवस विविध स्पर्धांचे तसेच प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. यात वक्तृत्व, भित्तीपत्रकनिर्मिती, संशोधन प्रकल्प सादरीकरण डिजिटल फलक निर्मिती अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.

पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ वक्तृत्व स्पर्धांनी झाला. या स्पर्धेचे विषय एड्स जनजागृती, एड्स निर्मुलन आणि सामाजीक बांधिलकी यांच्याशी निगडीत होते. विद्यार्थ्नांना तीनही भाषांमध्ये विषय मांडण्याची मुभा होती. सदर स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. जयंत अभ्यंकर आणि प्रा. सायली पिलणकर होते.

दुसऱ्या दिवशी भित्तीपत्रक आणि संशोधन प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरीतील प्रथितयश डॉक्टर आणि महाविद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ. ए. डी. परकार आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभाग प्रमुख डॉ. चंदा बेर्डे, प्रा. रश्मी भावे, डॉ. वर्षा घड्याळे, मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

AIDS Day
Comments are closed.