gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ‘एंजल्स फॉर कॅशलेस सोसायटी’ सज्ज

रोजच्या आर्थिक व्यवहारांच्या नियोजानाकरिता ई-बँकिंग व इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची सवय सर्वांना होणे होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत रोखीने व्यवहार करण्याची सवय असलेल्या नागरिकांना यापुढे ई-बँकिंग व कॅशलेस व्यवहारांची सवय करून घ्यावी लागणार आहे. तसेच या व्यवहारासाठी आवश्यक ते पर्यायही समजून घ्यावे लागणार आहेत.

या नागरिकांना नवीन तंत्रज्ञानातून कॅशलेस व्यवहाराकडे जाण्यासाठी योग्य त्या पर्यायांची माहिती करून देण्याची जबाबदारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उचलली आहे. महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ज्यामद्ध्ये स्वयंसेवकानी ग्राहक आणि व्यापारी या दोहोंच्या भूमिकेतून ई-बँकिंग व कॅशलेस समाज बनविण्यासाठीची कार्यप्रणाली समजून घेतली. आणि आता हे स्वयंसेवक प्रत्येकी १० कुटुंबियांपर्यंत जाऊन कॅशलेस सोसायटी बनविण्याकरिता नागरिक सजग आणि साक्षर करणार आहेत. एका अर्थी ते रोख विरहीत समाज म्हणून स्वयंप्रेरणेने काम करणार आहेत.

कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि आभार कार्याक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी केले.

Comments are closed.