गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या “पॉवर पॉइंट सादरीकरण स्पर्धेत” गोवा येथील चौगुले कॉलेजच्या कु. बेनित सेरा बोबेन हिने प्रथम क्रमांक पटकावला. खगोल अभ्यास कार्यशाळेच्या अनुषंगाने हि स्पर्धा घेण्यात आली होती. कार्यशाळेला गोगटे जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, फाटक हायस्कूल, जीजीपीएस इ. शैक्षणिक संस्थांतील ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळा १५ अग्रहायण १९३८ ते २१ अग्रहायण १९३८ या कालावधीत घेण्यात आली.
२० अग्रहायण १९३८ रोजी घेण्यात आलेल्या पॉवर पॉइंट सादरीकरण स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाबरोबरच देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे आणि गोवा येथील पार्वतीबाई चौघुले कॉलेज या तीन महाविद्यालयातील ९ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आय.ए.पी.टी.चे माजी अध्यक्ष डॉ. जी. व्ही. केळकर, कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक प्रा. हेमंत मोने आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.